Friday, January 30, 2026
Homeअध्यात्मनवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी स्वामींना दाखवा ' हा' नैवेद्य : संपूर्ण वर्ष...

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी स्वामींना दाखवा ‘ हा’ नैवेद्य : संपूर्ण वर्ष भरभराटीचे ,सुख समृद्धीचे जाईल !

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी स्वामींना दाखवा ‘ हा’ नैवेद्य : संपूर्ण वर्ष भरभराटीचे ,सुख समृद्धीचे जाईल !

मित्रांनो यंदाचे नवीन वर्ष स्वागत आपण गुरुवारी करणार आहोत. आणि या दिवशी प्रदोष देखील आला आहे. एक म्हणजे गुरुवारी नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि प्रदोष या सर्व चांगल्या गोष्टी एकत्र जुळून आल्याने यंदाची वर्षे नक्कीच आपणाला समाधानी आणि भरभराटीचे जाणार आहे. या दिवशी काही विशेष सेवा देखील आपण केल्या पाहिजेत.

मित्रांनो नवीन वर्ष आपण पहिला दिवस म्हणजे एखाद्या सना सारखा साजरा करतो. या दिवशी आपण सकाळी लवकर उठून सूर्याला अर्ध देऊन सकाळी देवपूजा वगैरे पूर्ण करून तसे दिवसभर स्वामींचे नामस्मरण करून आपण मिळेल तितके पुण्याचे काम या दिवशी करायचे आहे.

आपण कोणत्याही देवाला मानता श्रद्धा ठेवता त्याची दर्शन घ्या. वर्षातील पहिला दिवस आहे येणारे वर्षे आपणाला सुख-समृद्धीचे आणि आरोग्यदायी जाऊ दे अशी मनोभावे प्रार्थना करा. स्वामींची सेवा करत असाल तर नामस्मरण करा स्वामींना ही तसे सांगा.

याचबरोबर स्वामींचा आवडता नैवेद्य म्हणून आपण खीर, पुरणपोळी, भजी चपाती असे पूर्ण भरलेले ताट करून नैवेद्य करावा.

वेळेअभावी किंवा इतर कोणत्या अडचणीमुळे आपणाला इतका नैवेद्य करणे शक्य नसेल तर खीर किंवा एखादी पुरणपोळी आणि अगदीच काही नसेल तर दूध साखर याचा जरी नैवेद्य दाखवला तरी चालतो.

आपल्याजवळ मठ असेल किंवा केंद्र असेल तिथे घेऊन आणि शक्य असल्यास तर तिथे घेऊन जावे नसल्यास आपल्या देव्हार्‍यावरील किंवा आपल्या घरात ही स्वामींची मूर्ती आहे त्याला हा नैवेद्य दाखवल्यास तरी चालतो.

नैवेद्य दाखवूनही स्वामींकडे मनोभावी आपल्या आरोग्याची तसेच आपल्या कुटुंबातील सर्वांची काळजी घेण्याचे तसेच येणारी वर्ष चांगले येऊ दे, कर्ज loan असेल तर ते फेटू दे अशी मनोभावे प्रार्थना पूर्ण करायचे म्हणायचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -