पिण्याचे पाणीपुरवठा तसेच शेतीपंपांच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरमधून विद्युतप्रवाह वाढल्याने पंचगंगा नदी काठावरील अनेक मोटरी जळाल्याने शेतकऱ्यांसह ग्रामपंचायत, पाणीपुरवठा संस्थेचं लाखो रुपये नुकसान झाले आहे.
महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे फटका बसला आहे.
करवीर तालुक्यातील शिये येथील पंचगंगा नदी वरून या परिसरात असणाऱ्या शिये, टोप, शिरोली पुलाची, दक्षिणवाडी, संभापूर या परिसराला पाणी उपसा केला जातो. नदी काठावर या सर्व ग्रामपंचायत जॅकवेल आहेत. तसेच शेतीसाठी पाणी उपसा करण्यासाठी शेती पंप आहेत.
या पाणीउपसा करणाऱ्या विद्युत डेपी वरून उच्चदाबाची विद्युत पुरवठा ट्रान्सफॉर्मर वरून केला जातो. बुधवारी रात्री अचानक ट्रान्सफॉर्मर वर विद्युत प्रवाह लोढ आल्याने सर्व ठिकाणीचे पाणी उपसा मोटर जळाल्या आहेत. तसेच नेजदार, शिंदे, पाटील, आंबी या शेतकऱ्याचे विहारी तसेच नदीकाठावरील पंप जाळले आहेत.
महावितरणच्या भोंगळ कारभाराचा सर्वांना फटका बसला आहे. सातत्याने होणाऱ्या अशा नुकसानीला महावितरण जबाबदार असून ते याची जबादारी झटकत आहेत. शेतकऱ्यांची आता ऊस बियाणे शेतात पेरले आहेत आणि ऊस लावण करण्यापूर्वीच असा प्रकार घडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहेत याचबरोबर नदीकाठच्या अनेक गावांना पाणीपुरवठाही गेले चार दिवस झाले बंद आहे. महावितरण याबाबत गांभीर्याने लक्ष घालणं गरजेचं असल्याचे नागरिकांच्यातून बोलले जात आहे.



