Friday, January 30, 2026
Homeइचलकरंजीरांगोळीत पाठलाग करून युवकाचा निर्घृण खून

रांगोळीत पाठलाग करून युवकाचा निर्घृण खून

रांगोळी (ता. हातकणंगले) येथे गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास युवकाचा पाठलाग करून भीषण खून झाल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. शुभम कुमार सादळे (वय 28, रा. काळमवाडी वसाहत, रांगोळी) असे त्याचे नाव आहे.

 

शुभम सादळे याचे सर्व्हिसिंग सेंटर आहे. कुटुंबासह तो काळमवाडी वसाहतीजवळ राहतो. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास काळमवाडी स्मशानभूमीला लागून असलेल्या रिकाम्या जागेत उभ्या असलेल्या शुभमवर अज्ञातांनी धारदार शस्त्राने भीषण हल्ला केला. हल्ल्यातून बचावण्याचा प्रयत्न करत जीव वाचवण्यासाठी शुभम ओरडत जवळच असलेल्या आपल्या घराकडे पळत जात असताना पुन्हा त्याच्यावर हल्ला करण्यात आला.

 

वर्मी घाव बसल्याने तो रस्त्यातच कोसळला. दरम्यान, फारशी वर्दळ नसल्याने हल्लेखोर पसार झाले. मोठा रक्तस्राव झाल्याने बेशुद्ध पडलेल्या शुभमला उपचारासाठी इचलकरंजीला नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून उशिरापर्यंत पंचनाम्याचे काम सुरू होते. खुनाचे नेमके कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही. हुपरी पोलिस अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -