Friday, February 13, 2026
Homeक्रीडाठरलं! या दिवशी होणार अर्जुन तेंडुलकरचं लग्न, शाही विवाहसोहळ्याची तारीख समोर, कुठे...

ठरलं! या दिवशी होणार अर्जुन तेंडुलकरचं लग्न, शाही विवाहसोहळ्याची तारीख समोर, कुठे होणार लग्न?

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा लेक लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी अर्जुन तेंडुलकरने सानिया चांढोकशी साखरपुडा केला. त्यानंतर सचिनचा लेक कधी बोहल्यावर चढणार याकडे सर्वांचे लक्ष होते. आता सचिन तेंडुलकरच्या घरातील लग्न म्हटल्यानंतर शाही थाट तर असणारच. आता हा लग्नाची तारीख समोर आली आहे, तसेच लग्नाला कोण कोण उपस्थित असणार याची देखील यादी समोर आली आहे.

 

मास्टर ब्लास्टरने स्वतः आपल्या मुलाच्या लग्नासाठी भारतातील काही मोठ्या व्यक्तींना आमंत्रण दिले आहे. अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांढोक यांच्या लग्नाच्या पाहुण्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इतर अनेकांचा समावेश आहे. अहवालांनुसार, सचिन आणि अंजली तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन सानिया चांढोक यांच्याशी ५ मार्च २०२६ रोजी लग्न करणार आहे. आमंत्रणांची यादी पाहता हे लग्न राष्ट्रीय स्तरावर साजरे होणार असल्याचे दिसते. मात्र, त्यांचा लग्न सोहळा कुठे पार पडणार याबाबत माहिती समोर आलेली नाही.

 

सानिया ही ग्रॅविस ग्रुपचे चेअरमन रवी घाई यांची नात आहे. ग्रॅविस ग्रुपमध्ये बास्किन रॉबिन्स, ब्रुकलिन क्रीमरी आणि लग्जरी इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल्स यांचा समावेश आहे. त्यांच्या कुटुंबाकडे क्वालिटी आइसक्रीम ब्रँडही आहे, जो अनेक पिढ्यांच्या बालपणातील आठवणींशी जोडला गेला आहे. सानिया सनी चांढोक आणि गौरिका घाई चांढोक यांची मुलगी आहे. ती स्वतः एक उद्योजिका आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या रेकॉर्डनुसार, सानिया मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोअर LLP या मुंबई-आधारित कंपनीची डिझाइनेटेड पार्टनर आणि डायरेक्टर आहे, जी पेट न्यूट्रिशन आणि वेलफेअरवर केंद्रित आहे. सानिया बराच काळ तेंडुलकर कुटुंबाशी जोडलेली आहे. विशेषतः अर्जुनची बहिण साराशी, ज्यामुळे मैत्री प्रेमात बदलली.

 

अर्जुन तेंडुलकरविषयी

 

२६ वर्षीय अर्जुन मैदानावर एक पेस-बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून वडिलांच्या मोठ्या सावलीतून बाहेर पडून स्वतःची ओळख निर्माण करत आहे. त्याने २०२०-२१ हंगामात मुंबईतून सिनियर करिअर सुरू केले, हरियाणाविरुद्ध T20 मध्ये डेब्यू केले. २०२२-२३ मध्ये तो गोव्यात गेला, जिथे त्याने फर्स्ट-क्लास आणि लिस्ट A डेब्यू केले. यापूर्वी मुंबईसाठी ज्युनियर क्रिकेट आणि भारताच्या U-19 संघातही खेळला

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -