कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात आज सकाळी भीषण (godown)आग लागल्याची घटना घडली. सांगली नाका परिसरातील कापड उद्योगासाठी वापरण्यात येणाऱ्या सुताच्या दोऱ्याच्या गोडाऊनला अचानक आग लागल्याने परिसरात धुराचे मोठे लोट(godown) पसरले.
आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नसून गोडाऊनमध्ये (godown)मोठ्या प्रमाणावर सुताचा साठा असल्याने काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. या आगीत अंदाजे दोन ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.





