Saturday, February 21, 2026
Homeमहाराष्ट्रप्रवाशांनो सावधान! १ मार्चपासून ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप कायमचं बंद होणार

प्रवाशांनो सावधान! १ मार्चपासून ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप कायमचं बंद होणार

भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे.(permanently) रेल्वेने १ मार्चपासून UTS मोबाईल अ‍ॅप सेवा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे जनरल तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट ऑनलाइन बुक करणाऱ्या प्रवाशांना आता नव्या अ‍ॅपचा वापर करावा लागणार आहे. हा बदल लाखो दैनंदिन प्रवाशांवर परिणाम करणारा ठरणार आहे.सध्या अनेक प्रवासी मोबाईलद्वारे सहजपणे अनारक्षित तिकीट काढण्यासाठी UTS अ‍ॅपचा वापर करत आहेत. मात्र डिजिटल सेवा एकत्रित करण्याच्या उद्देशाने Indian Railways ने हे अ‍ॅप १ मार्चपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर सर्व सेवा एका नव्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

 

UTS अ‍ॅप बंद झाल्यानंतर प्रवाशांना RailOne अ‍ॅपचा वापर करावा लागेल.(permanently) रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, प्रवाशांना सर्व रेल्वे सुविधा एकाच अ‍ॅपमध्ये उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा बदल करण्यात आला आहे. १ मार्चनंतर जनरल तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट आणि इतर संबंधित सेवा केवळ RailOne अ‍ॅपवरच मिळणार आहेत.या नव्या अ‍ॅपमध्ये अधिक सुलभ इंटरफेस आणि सुधारित सुविधा देण्यात आल्या असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. प्रवाशांना वेगवेगळ्या अ‍ॅप्सची गरज भासणार नाही. आरक्षित तिकीट, अनारक्षित तिकीट आणि इतर डिजिटल सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतील, असेही सांगण्यात आले आहे.

 

RailOne अ‍ॅपवर तिकीट बुकिंगसह विविध सेवा एकत्रित करण्यात आल्या आहेत.(permanently) प्रवाशांना IRCTC रेल कनेक्ट, NTES, Rail Madad आणि Food on Track यांसारख्या सुविधा RailOne अ‍ॅपमधूनच वापरता येणार आहेत. ट्रेनचे लाईव्ह रनिंग स्टेटस, उशीराची माहिती, कोच पोझिशन, प्लॅटफॉर्म क्रमांक आणि PNR स्थिती देखील सहज तपासता येईल.ज्या प्रवाशांकडे UTS अ‍ॅपमधील R-वॉलेटमध्ये शिल्लक रक्कम आहे, ती RailOne अ‍ॅपमध्ये वापरता येईल. जुन्या लॉगिन आयडी आणि पासवर्डद्वारे साइन इन करता येणार आहे. याशिवाय डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी रेल्वेने विशेष ऑफर जाहीर केली आहे. RailOne अ‍ॅपवर जनरल तिकीट बुक करताना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UTS पेमेंट पद्धतीचा वापर केल्यास ३ टक्के सवलत मिळेल. ही सवलत १४ जुलै २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -