काही दिवसांआधी प्रसिद्ध युट्यूबरनं आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. तिच्या मृत्यूची माहिती मिळताच तिच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला होता. बॉयफ्रेंडबरोबर ब्रेकअप झाल्यामुळे तिनं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात होतं.
अखेर युट्यूबरच्या डायरीत तिच्या आत्महत्येसंबंधी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कोमली असं 21 वर्षांच्या युट्यूबरचं नाव आहे. तिनं बुधवारी हैद्राबाद येथे राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला पोलिसांना तिच्या घरात एक डायरी सापडली त्यात तिनं मुव्ह ऑन व्हायची भीती वाटतेय असं लिहिलं होतं.
कोमलीचं निखिल रेड्डी नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. निखिल रेड्डी हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून तोदेखील यूट्यूबर आहे. तोही मूळचा विशाखापट्टणमचा आहे. दोघाचं सहा महिन्यांआधी ब्रेकअप झालं होतं. हे कोमलीच्या कुटुंबीयांना देखील माहिती होतं. त्यांनी देखील अनेकदा समजावलं होतं. पण अखेर तिनं आयुष्य संपवलं.
( सिनेसृष्टी हादरली! दिग्दर्शकाचं अपहरण अन् बेदम मारहाण; ऐश्वर्यासह 11 जणांना बेड्या, नेमकं प्रकरण काय? )
आत्महत्या करण्याआधी कोमलीनं तिच्या आईला मेसेज पाठवला होता. त्या मेसेजमध्ये काहीतरी गडबड आहे असं तिच्या आईला जाणवलं. ती तिला सतत फोन करत होती मात्र तिला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तिने तिच्या मित्र मैत्रिणींना जाऊन बघायला सांगितलं. मैत्रिणी तिच्या हैद्राबादच्या मणिकोंडा येथील घरी गेल्या. ती बराच वेळ दार उघडत नव्हती. त्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी दार तोडलं तेव्हा कोमलीनं गळफास लावून घेतला होता.
पोलिसांना घरात कोमलीची डायरी सापडली. ज्यात 21 फेब्रुवारीची शेवटची नोंद होतं. ब्रेकअपशी दोन हात करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत असल्याचं तिनं लिहिलं होतं. तिनं लिहिलं होतं, मला आयुष्यात पुढे जाण्याची भीती वाटते कारण जर तो परत आला तर काय. मला माहिती आहे मी त्याला सोडून द्यायला हवं. तो माझा नाही, तो तसे प्रयत्नही करत नाही. पण माझ्यातला एक अंश अजूनही त्याची वाट पाहतोय. अजूनही आशा आहे की एक दिवस तो माझी निवड करेल म्हणून पुढे जाणं अशक्य वाटतंय. ज्या क्षणी मी शेवटची निघून जाईन तेव्हा त्याने मागे वळून मला शोधायचा प्रयत्न केला तर.
सहा महिन्यांआधी देखील कोमलीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. काही दिवसांआधी तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी बोलावलं होतं. त्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांना सापडलं आहे. कोमलीनं त्याने पॅचअप करण्याची विनंती केली मात्र त्याने विनंती नाकारली आणि शांतपणे निघून गेला. सीसीटीव्हीमध्ये कोमली दारात उभी आहे आणि तो शांतपणे मागे वळून निघून जाताना दिसत आहे.







