नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो घरात भांडण का होतात पैसा का टिकत नाही आणि त्यावर काय केले असता आपणाला भांडणही बंद होईल आणि पैसाही टिकेल याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो कसल्याही यशाची गुरुकिल्ली म्हणजे घरामधील शांतता असते. कारण शांतिप्रिय वातावरणामध्ये ज्या कामाची सुरुवात केली जाते ते काम नेहमी पूर्णच होत असते.
तुम्हाला माहिती आहे ज्या घरामध्ये शांतता नांदत असते त्या घरामधील आर्थिक परिस्थितीसुद्धा चांगली असते.
कारण त्या घरातील सर्व लोक मिळून एकमेकांशी प्रेमाने वागत असतात आणि अशा ठिकाणीच माता लक्ष्मीचे वास्तव्य असतं. म्हणूनच मित्रांनो घरामध्ये शांतता नांदणे खूप महत्त्वाच असत.
आपल्या घरामध्ये शांतता नांदत असेल तर चांगली गोष्ट आहे पण आपल्या घरी नेहमी कलह होत असतील, आपल्या घरातील व्यक्ती एकमेकांशी पटत नसेल, काही व्यक्ती एकमेकांशी बोलत नसतील.
एकाच्या विचाराशी दुसरा सहमत होत नसतील, आरे ला कारे किंवा भांड्याला भांड लागत असेल तर मग अशा परिस्थितीमध्ये आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते सोपे उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्ये शांतता नांदण्यासाठी शांतता टिकवण्यासाठी खूप मदत करतील.
मित्रांनो प्रत्येक घरामध्ये वास्तुपुरुष म्हणून एक पुरुष असतो. जो स्वतः शांत असेल तरच घरामध्ये शांतता नांदत असते आणि म्हणून त्याला सदैव शांत व प्रसन्न ठेवणे हे प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे.
वास्तुपुरुष म्हणजे कोण ? तर ती घराची वास्तु आहे. म्हणजे जी वास्तू आहे तिला वास्तुपुरुष असे संबोधले जाते.
यासाठी पहिला उपाय हा करायचा आहे की रोज रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर
श्री वास्तुपुरुषाय नमः
अस हात जोडून एकदा म्हणायच आहे आणि त्या वास्तुपुरुषाला वंदन करायच आहे.
त्याच प्रमाणे घरामध्ये कुठलाही अनाचार किंवा अघटित घडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कारण वास्तुपुरुषाला ते आवडत नाही.
म्हणून घरामध्ये भांडणतंटा करु नये.
आदळआपट करू नये. दारू पिऊन घरात येऊ नये आणि मुख्य म्हणजे घरात आलेल्या अतिथीचा अपमान करू नये. मित्रांनो या गोष्टी तुम्ही कटाक्षाने टाळल्या पाहिजेत.
मित्रांनो वास्तुपुरुषाला रोज नैवेद्य दाखवणे हा एक चांगला उपाय आहे. त्याच प्रमाणे घरांमध्ये दर अमावसेला आणि दर गुरुवारी धूप जाळावा.
त्याचबरोबर देवघरात आणि देवघरातील देवांच्या फोटोंना सुवासिक फुले किंवा हार घालावा त्यामुळे घरातील वातावरण भक्तिमय होईल घरात सकारात्मकता येईल.
या सर्वांचा परिणाम थेट आपल्या मनावरती होतो. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तिन्हीसांजेच्या वेळी श्रीरामरक्षास्तोत्र आणि भीमरुपी स्तोत्र मोठ्या आवाजात जरूर म्हणावे.
त्यामुळे घरात कलह घडवून आणणाऱ्या अघटित घटना घडणाऱ्या घडवून आणणाऱ्या याचा वाईट प्रवृत्ती आहेत त्या घरातून बाहेर निघून जातील. परिणामी तुमच्या घरात शांतता नांदेल.
मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे ज्या घरात स्वच्छता शांतता आणि प्रसन्न वातावरण असते अशा ठिकाणी लक्ष्मी सदैव वास करत असते. त्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होतील, धनाची याची बरसात होईल तुम्हाला कधीच पैशाची कमतरता भासणार नाही.
या सर्वांचा परिणाम म्हणजे घरी शांतता नांदेल त्यामुळे घरातील सर्व लोक एकमेकांशी प्रेमाने बोलतील तुम्ही बाहेर पडताना तुमचे मन प्रसन्न असल्यामुळे तुम्ही जे काही काम करणार आहात ते पूर्ण होईल.
वरील उपाय हे वेगवेगळ्या शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आलेले आहेत.
मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगितलेला हा सोपा नक्की करून पहा. आम्ही तुम्हाला उपाय सांगितले ते कसे वाटले? हेही आम्हाला कमेंट मध्ये सांगा. पेजला लाईक करा आपले मित्र परिवारासोबत तसेच मित्रांसोबत शेअर करा.





