Monday, March 9, 2026
Homeमहाराष्ट्रबनावट दारूचा महापूर मोठा, जप्त केला 10 कोटींचा साठा

बनावट दारूचा महापूर मोठा, जप्त केला 10 कोटींचा साठा

आंतरराज्य दारू तस्करांनी कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. पुणे-बंगळूर, रत्नागिरी-नागपूर महामार्गासह सीमाभागातील छुप्या मार्गाने बनावट, भेसळ दारूच्या बिनबोभाट तस्करीचे रतीबच लागले आहे.

 

राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर पथकाने 1 एप्रिल 2025 ते 28 फेब्रुवारी 2026 काळात 10 कोटी 19 लाख 79 हजाराच्या दारूसाठ्यासह मुद्देमाल जप्त करून 2250 तस्करांची जेलवारी घडविली आहे.

 

अपुरे मनुष्यबळ…!

 

राज्य सरकारच्या महसुलात मोठी भर घालणार्‍या कोल्हापूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत आंतरराज्य तस्करी टोळ्यांना रोखण्यासाठी प्रयत्न होत असतानाच अपुर्‍या मनुष्यबळाचाही पथकाला सामना करावा लागत आहे. जिल्ह्यासाठी 210 मंजूर पदांपैकी 177 अधिकारी, कर्मचार्‍यांवर डोलारा सांभाळावा लागत आहे. त्यात निरीक्षक 2, दुय्यम निरीक्षक 12, सहायक दुय्यम निरीक्षक 13, पोलिस जवान 15, वाहन चालक 3 अशी पदे रिक्त आहेत.

 

कुख्यात तस्करी टोळ्यांचा सिलसिला, सुरक्षा यंत्रणा भेदूनच…

 

गतवर्षी 1 एप्रिल 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 काळात एकूण 5 कोटी 54 लाख 87 हजार 303 रुपयांची गोवा बनावटीची दारू हस्तगत करण्यात आली होती. यंदा एप्रिल ते फेब्रुवारी या दहा महिन्याच्या काळात त्यात दुपटीने वाढ झाली आहे. चालू वर्षात 5 कोटी किमतीची दारू हस्तगत करण्यात आली आहे. पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची सुरक्षा यंत्रणा भेदून कुख्यात आंतरराज्य तस्करी टोळ्यांचा सिलसिला सुरू आहे.

 

बनावट, भेसळ दारू तस्करीत वाढ!

 

मार्च ते फेब्रुवारी 2026 काळात शहर, जिल्ह्यात तस्करीचे 2 हजार 374 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 228 वाहने धक्क्याला लावण्यात आली आहेत. गतवर्षी 2 हजार 73 गुन्हे दाखल करून 1 हजार 996 तस्करांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या; तर 157 वाहने हस्तगत करण्यात आली होती. दोन वर्षाच्या तुलनेत यंदा बनावट, भेसळ दारू तस्करीमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -