Friday, April 10, 2026
Homeमहाराष्ट्रधक्कादायक घटना, सात वर्षाच्या चिमुरडीवर शेजाऱ्याकडून अत्याचार

धक्कादायक घटना, सात वर्षाच्या चिमुरडीवर शेजाऱ्याकडून अत्याचार

पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक (shocking incident) संतापजनक घटना समोर आली आहे. एका ४० वर्षीय नराधमाने आपल्या सात वर्षांच्या निष्पाप शेजारील मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण विनायकनगर शिवशंभो कॉलनी परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, (shocking incident) रामु कुंजल निसाद (वय ४०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने २ एप्रिल रोजी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पीडित चिमुरडीला आमिष दाखवून आपल्या खोलीत बोलावले आणि तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने मुलीला दिली होती. मात्र, आरोपीची विकृती एवढ्यावरच थांबली नाही. दुसऱ्या दिवशी, ३ एप्रिल रोजी सकाळी त्याने पुन्हा पीडितेला आपल्या खोलीत बोलावून अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली.

 

सुदैवाने, पीडितेची आई आणि आत्याने खिडकीतून हा सर्व प्रकार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. (shocking incident) आपल्या पोटच्या गोळ्यासोबत घडणारा हा भयानक प्रकार पाहून त्यांनी विलंब न लावता पोलिसांकडे धाव घेतली. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर एमआयडीसी भोसरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी रामु निसाद याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ६४ (१), ६५ (२), ७४, ३५१ आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. एका शेजाऱ्यानेच अशा प्रकारे विश्वासघात आणि क्रौर्य दाखवल्याने परिसरात दहशतीचे आणि निराशेचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -