भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. बेंगळुरूस्थित Simple Energy कंपनीने आपली सर्वात प्रीमियम आणि दमदार इलेक्ट्रिक स्कूटर Simple Ultra अधिकृतपणे लाँच केली आहे. एका चार्जमध्ये तब्बल 400 किलोमीटर (IDC) रेंज देण्याचा दावा करणारी ही स्कूटर सध्या भारतातील सर्वाधिक रेंज असलेली ई-स्कूटर मानली जात आहे.
कंपनीने या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत ₹2,34,999 ठेवली आहे. या गाडीची बुकिंग आधीच सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, ग्राहकांना या स्कूटरची तत्काळ डिलिव्हरी देखील मिळणार आहे. आकर्षक डिझाइन, प्रीमियम फीचर्स आणि दमदार परफॉर्मन्स यामुळे Simple Ultra ने लाँच होताच बाजाराचे लक्ष वेधले आहे.







