Tuesday, April 28, 2026
Homeमहाराष्ट्रबिर्याणीनंतर कलिंगड खाणं बेतलं जीवावर, एकाच कुटुंबातील ४ जणांचा संशयास्पद मृत्यू

बिर्याणीनंतर कलिंगड खाणं बेतलं जीवावर, एकाच कुटुंबातील ४ जणांचा संशयास्पद मृत्यू

पायधुनी परिसरातून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. अन्नातून झालेल्या संशयित विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.(Paydhuni) या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात भीती आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कुटुंबाने रात्रीच्या जेवणात बिर्याणी खाल्ली होती आणि त्यानंतर काही वेळाने कलिंगडाचे सेवन केले होते. हे पदार्थ खाल्ल्यानंतर काही वेळातच कुटुंबातील सदस्यांना उलट्या, मळमळ आणि प्रकृती खालावल्याची लक्षणे जाणवू लागली. परिस्थिती गंभीर होत गेल्याने त्यांना उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र उपचारांदरम्यान चौघांचाही मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि (Paydhuni) त्यांनी पंचनामा करून तपास सुरू केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, नेमकी विषबाधा कशामुळे झाली याचा शोध घेण्यासाठी अन्नाचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

 

बिर्याणी आणि कलिंगड एकत्र खाल्ल्यामुळे काही रासायनिक प्रतिक्रिया झाली का, की त्यापैकी एखादा पदार्थ आधीच दूषित किंवा खराब होता, (Paydhuni)याचा तपास सध्या सुरू आहे. फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच या प्रकरणामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.दरम्यान, एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांमध्ये अन्नसुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -