Tuesday, May 12, 2026
Homeमहाराष्ट्रआईच्या प्रेमसंबंधांचा संताप ; मुलानेच केला प्रियकराचा खून

आईच्या प्रेमसंबंधांचा संताप ; मुलानेच केला प्रियकराचा खून

पुण्यातील इंद्रायणी नगर परिसरात रविवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसर हादरून गेला आहे. एका विवाहित महिलेसोबत सुरू असलेल्या कथित प्रेमसंबंधांचा शेवट थेट रक्तरंजित हत्येत झाला.

 

आईच्या संबंधांवरून संतप्त झालेल्या मुलाने आपल्या साथीदारासह महिलेच्या प्रियकराची निर्घृण हत्या केल्याचा आरोप समोर आला आहे. Pune Crime News

 

मृत व्यक्तीची ओळख दीपक क्षीरसागर (वय-37) अशी झाली आहे. आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेल्को कॉलनी परिसरात ही घटना घडली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, दीपक यांचे एका विवाहित महिलेसोबत संबंध होते. या संबंधांना महिलेच्या मुलाचा तीव्र विरोध होता. याच कारणावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. Pune Crime News

 

रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वाद अचानक उग्र झाला. त्यानंतर महिलेच्या मुलाने आपल्या साथीदाराच्या मदतीने दीपक यांच्यावर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या दीपक यांचा जागीच मृत्यू झाला. Pune Crime News

 

घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित सिद्धार्थ हातुरे आणि अनिकेत हातुरे या दोघांना ताब्यात घेतले. सध्या दोघांची कसून चौकशी सुरू असून, हत्येमागील नेमका घटनाक्रम, वापरण्यात आलेले शस्त्र आणि इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. Pune Crime News

 

दरम्यान, या थरारक घटनेनंतर इंद्रायणी नगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तपासानंतर आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -