Thursday, May 14, 2026
Homeमहाराष्ट्र'ऑनलाइन क्लासेस घ्या', पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशातील शाळांना आवाहन

‘ऑनलाइन क्लासेस घ्या’, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशातील शाळांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा देशातील नागरिकांना अतिशय मोलाच्या सूचना केल्या आहेत. मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धामुळे जागतिक तेलसंकट निर्माण झालं आहे.

 

या तेलसंकटामुळे जगात तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. यामुळे भारताचे परकीय चलन जास्त खर्च होत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला पेट्रोल, डिझेल यांचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना प्रत्यक्ष कार्यालयात न जाता वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन मीटिंगच्या माध्यमातून काम करण्याचं आवाहन केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी कालच्या भाषणानंतर आज सुरतमध्ये भाषण केलं. यावेळी त्यांनी शाळांनादेखील ऑनलाइन क्लासेस घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच देशातील जनतेला पुढील वर्षभर सोने खरेदी न करण्याचं आवाहन केलं आहे.

 

“माझं देशाच्या प्रत्येक नागरिकाला आवाहन आहे, शक्य होईल तितकं पेट्रोल-डिझेलचा उपयोग कमी करा. मेट्रोचा उपयोग करा, इलेक्ट्रिक बस आणि सार्वजिनक वाहनांचा वापर जास्त करा. ज्यांच्याकडे कार आहे, त्यांनी एका गाडीत जास्त लोकांना जास्त घेऊन जावं. त्यांच्याकडे इलेक्ट्रिक वाहनं आहेत ते दुसऱ्यांच्या मदतीसाठी पुढे या”, असं आवाहन मोदींनी केलं आहे.

 

 

नरेंद्र मोदी यांचा शाळांना ऑनलाइन क्लासेसचा आग्रह

 

“डिजीटल टेक्नोलॉजीने आता खूप गोष्टी सोप्या केल्या आहेत. टेक्नोलॉजीची मदत आपल्या सगळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरेल. हे जरुरी आहे की, सरकारी आणि खासजी दोन्ही क्षेत्रांमध्ये व्हर्च्युअल मीटिंग आणि वर्क फ्रॉम होमला प्राथमिकता दिली जावी. मी काही शाळांनादेखील आग्रह करेन की, काही कालावधीसाठी ऑनलाईन क्लासेसच्या व्यवस्थेवर काम करावं”, असं मोठं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं.

 

“केवळ इंधनच नाही तर खाद्यतेलावरही देशाचं परकीय चलन खर्च होतं. आपण थोडं संयम बाळगलं, खाद्य तेलाचा वापर थोडा कमी केला तर यामुळे देश आणि आपल्या आरोग्य दोघांना फायदा होईल”, असं मोदी म्हणाले.

 

“मी आज समाजाच्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की, तुम्हाला मला मदत करावी लागेल. सोन्याच्या आयातीवर देशाचे खूप पैसे विदेशात जातात. त्यामुळे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की, जोपर्यत परिस्थिती सामान्य होत नाही, आपण सोन्याची खरेदी टाळावी. सोन्याची आवश्यकता नाहीय”, असं आवाहन त्यांनी केलं.

 

“आज वोकल फॉर लोकलला जन आंदोलन बनवावं ही आजच्या काळाची मागणी आहे. विदेशी सामानाऐवजी लोकल उत्पादन खरेदी करा. आपले गाव, आपले शहर, आपल्या देशाच्या उद्योगपतींना ताकद द्यावं. इथे अनेक जण बसले आहेत. खूप चांगल्या वस्तूंचे उत्पादन करतात”, असा दावा मोदींनी केला.

 

“आपल्यापैकी सर्वाधिक जनता शेतकरी कुटुंबातून पुढे आलेली आहेत. शेतात स्वदेशी खतांना चालना मिळावी, नैसर्गिक शेतीला प्राधान्य मिळावं, डिझेल पंपच्या ऐवजी सोलार पंपचा वापर वाढावा. आपण तर शेतकऱ्यांचे पुत्र आहोत. आपल्याला सर्वात आधी आपल्या शेतीला आणि जमिनीला, आपल्या धरती मातेला वाचवायचं आहे. आपल्याला केमिकल फर्टिलायजरने आपल्या शेतीला मारायचं नाही. त्यामुळे मी आपल्या सर्वांना आग्रह करेन की, तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला नैसर्गिक शेती करण्यास प्रवृत्त करावं”, असं आवाहन मोदींनी केलं.

 

“सुट्ट्यांमध्ये विदेशी फिरायला अनेक जण जातात. अनेक जण विदेशात जावून डेस्टीनेशन वेडिंग करतात. विदेशात वेडिंगचा फॅशन खूप तयार होत आहे. पण त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च होतो. भारतात अशी जागा नाहीय का जिथे आपण डेस्टीनेशन वेडिंग करावं? लग्नांसाठी भारतापेक्षा पवित्र जागा असूच शकत नाही. जेव्हा इथे लग्न करतो तेव्हा आपल्या पूर्वजांची मातीदेखील आपल्याला आशीर्वाद देते. लग्नासाठी भारतातील अनेक स्थळ आपण निवडू शकतो. आमच्या गुजरातमध्ये एकापेक्षा एक चांगली ठिकाणी आहेत”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -