Saturday, June 6, 2026
Homeइचलकरंजीइचलकरंजीत नागरिकांची दाणादाण

इचलकरंजीत नागरिकांची दाणादाण

इचलकरंजी शहरामध्ये काल पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे उकड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे आज संध्याकाळी पावसाने हजेरी लावली, मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतीच्या कामांना आता वेळ आला आहे.

 

मिरजमध्येही पावसाच्या सरी

सांगलीतील मिरज शहरामध्ये जोरदार पाऊस पडला. सकाळपासून उकाड्याने लोक हैराण झाले होते, सायंकाळनंतर वातावरणात बदल झाला आणि ढगाळ वातावरण निर्माण झालं. त्यानंतर वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाच्या दमदार एंट्रीमुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत असून पावसाच्या आगमनामुळे शेतीच्या पेरण्यांच्या कामांना वेग येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -