थकीत निराधार पेन्शन तातडीने वितरित करावी, पेयानची राक्रम वाढवावी आणि लाभार्थ्यांना दरमहा नियमित अनुदान मिळावे या प्रमुख मागण्यांसाठी इचलकरंजी वृद्ध, निराधार, दिव्यांग पेन्शनधारक संघटनेने आजपासून येथील अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलनाबाबत पूर्वकल्पना देऊनही अप्पर तहसीलदार निवेदर स्वीकारण्यास अनुपस्थित राहिल्याने घोषणाबाजी करत प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध करण्यात आला. वाढत्या महागाईमुळे सध्याचे पेवानचे अनुदान अपुरे पडत असून अनेक लाभार्थ्यांना ७-८ महिन्यांपासून अनुदान मिळाले नाही. नाही. परिणामी औषधोपचार, अन आणि दैनंदिन गरजांसाठी त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महिन्याला किमान २५०० रुपये पेन्शन, सर्व लाभार्थ्यांचे थकीत अनुदान तातडीने अदा करावे, महिन्याला नियमित पेन्शन वितरित करावी या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला. आंदोलनात भाऊसाहेब कसबे, धनाजी जाधव, सदा मलाबादे, उषा माळी, यासीन भुई, सुलोचना निळकंठ, श्रीदेवी कांबळे, लक्ष्मी गणेकर, पद्मा कांबळे, संजय टेके, दादासो कांबळे यांच्यासह पेन्शनधारक सहभागी झाले



