Homeइचलकरंजीवांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंब्यासाठी इचलकरंजीत उपोषण

वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंब्यासाठी इचलकरंजीत उपोषण

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील आंदोलनाला विविध पाठीव्यासाठी सोमवारी महात्मा गांधी चौकात युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. केंद्र सरकारने आंदोलकांच्या रास्त मागण्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनावेळी राजकीय पक्ष, कामगार संघटना आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून पाठींबा दर्शवला.

 

या आंदोलनात उपोषणात युवा महाराष्ट्र सेनेचे पक्षप्रमुख सॅम आठवले, सचिन बेलेकर, जुबेर खतीब, राहुल लोकर, सदाशिव बंडीगणी, रवी कवडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी यावेळी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला नागरिक आणि कार्यकत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. केंद्र शासनाने जनभावनेचा आदर करत दिल्लीतील उपोषणकर्त्यांशी त्वरित चर्चा करून तोडगा काढण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. दिवसभरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदबंद्र पवार गट), लालबावटा, आम आदमी पार्टी, राष्ट्र सेवा दल, संविधान परिवार यांसह विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकत्यांनी या आंदोलनाला पाठींबा दर्शवला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -