Homeकोल्हापूरबाप की नराधम! कोल्हापुरातील घटना पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या...

बाप की नराधम! कोल्हापुरातील घटना पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार..

कोल्हापूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका नराधम बापाने आपल्याच दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार गांधीनगर परिसरात उघडकीस आला आहे.

 

या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर हादरले असून परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

 

आरोपी हा व्यवसायाने गवंडी असून, तो पत्नी आणि दोन मुलींसह राहत होता. त्याने केवळ १३ वर्षांच्या धाकटीलाच नाही, तर १६ वर्षांच्या मोठ्या मुलीलाही आपल्या वासनेची शिकार बनवले होते. नोव्हेंबर 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीत हा अमानवीय प्रकार सुरू होता. नराधम बाप मुलींना जिवे मारण्याची धमकी देऊन हा प्रकार त्यांच्या आईपासूनही लपवून ठेवायला भाग पाडत होता.

 

गेल्या आठवड्यात धाकट्या मुलीच्या पोटात तीव्र दुखू लागल्याने तिने हा प्रकार सहन न होऊन आपल्या आईला सर्व सत्य सांगितले. मुलीने बापाच्या कृत्याचा पाढा वाचताच आईच्या पायाखालची जमीन सरकली. मुलीने धाडस दाखवून सर्व माहिती दिल्यानंतर आईने नराधम पतीला जाब विचारला, मात्र त्याने उलट वाद घातला. त्यानंतर पीडित मुलींच्या आईने त्वरित गांधीनगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली.

 

फिर्याद मिळताच गांधीनगर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी बापाला त्याच्या घरातून बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

आई-वडील आणि मुलीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे समाजात भीती आणि संतापाचे वातावरण आहे. अशा नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -