केंद्रीय मंत्रीमंडळात लवकरच फेरबदल होणार, खातेबदल होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही लवकरच राजधानी दिल्लीत जाणार,अशाही चर्चांना गेल्या काही काळापासून उधाण आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या असून सध्या सर्वत्र याच चर्चा रंगल्या आहेत. या मुद्यावरून नुकतंच, मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मला महाराष्ट्रातच राहायचं आहे, मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, असं त्यांनी म्हटलं. तर दिल्लीला जाण्याच्याचर्चंवरून खुद्द मुख्यमंत्र्यांनीच आता मौन सोडलं आहे. ‘जे दिलंय ते उत्तम आहे, चित्त नेहमी समाधानी असू द्यावं’ जे दिलयं त्यात मी समाधानी आहे, याचा पुनरुच्चार करत त्यांनी दिल्लीत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
आषाढी एकादशीच्या मंगलदिनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची महापूजा करण्यात आली. मोदी हे या पदावर सर्वाधिक काळ राहिलेली व्यक्ती ठरले आणि तुम्हीही मुख्यमंत्रीपदावर बराच काळ राहिले आहात. यावर प्रतिक्रिया देतना मुख्यमंत्री म्हणाले, “निश्चित पांडुरंगाचा आशिर्वाद आहे. पण मी या पदावर सर्वाधिक काळ राहिलेलो नाही. तिसरा माझा क्रमांक आहे. पांडुरंगाची इच्छा असेल तोपर्यंत आपल्याला काम करायचं आहे. मला असं वाटतं की पदावर आपण किती काळ राहिलो, हे महत्वाचं नाही. आपण नेमकं त्या काळाचा नेमका उपयोग काय केला हे महत्वाचे आहे. मला विश्नास आहे कि पांडुरंगाच्या कृपेने अनेक चांगली काम माझ्या हातुन होतील” असं मुख्यमंत्री फडणवीसांनी नमूद केलं.



