Homeमहाराष्ट्र'एसआयआर'मध्ये वगळलेल्या मतदारांची पुन्हा पडताळणी

‘एसआयआर’मध्ये वगळलेल्या मतदारांची पुन्हा पडताळणी

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) प्रारूप मतदारयादीतून नाव वगळलेल्या मतदारांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. या मतदारांकडून गणना अर्ज भरून घेतले जातील. त्याबाबतचे वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

 

यामुळे वगळलेल्या मतदारांना अंतिम मतदारयादीत नाव समावेशाची पुन्हा संधी मिळणार आहे. त्या‍मुळे ‘एसआयआर’ कार्यक्रमाला मुदतवाढ मिळाली असून, ३० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणारी अंतिम मतदारयादी आता २२ डिसेंबरला प्रसिद्ध होईल.

 

निवडणूक आयोगाच्या १४ मे २०२६ रोजीच्या पत्रान्वये जिल्ह्यात ३० जून ते १७ ऑगस्ट या काळात मतदारयाद्यांचा ‘एसआयआर’ कार्यक्रम राबविण्यात आला. ३,४५० बीएलओकडून ३३ लाख ५५ हजार २४४ मतदारांची पडताळणी झाली. त्यातून मयत, दुबार, कायमस्वरूपी स्थलांतरित अशी ४ लाख ४९ हजार २१३ मतदारांची नावे रद्द करून २९ लाख ६ हजार ३१ मतदारांची प्रारूप मतदारयादी ३१ ऑगस्टला प्रसिद्ध केली होती.

 

या यादीतून वगळलेल्या ४ लाख ४९ हजार २१३ मतदारांची आता पुन्हा पडताळणी केली जाईल. यासाठी गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन १८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत होईल. प्राप्त प्रपत्रांवर १० डिसेंबरपर्यंत कार्यवाही केली जाईल. दावे व हरकती निकाली काढण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर असून, अंतिम मतदारयादी २२ डिसेंबरला प्रसिद्ध केली जाईल.

 

बीएलओ पुन्हा मतदारांच्या घरी

 

यापूर्वीच मयत, अनुपस्थित, स्थलांतरित आणि दुबार या कारणांनी नाव रद्द केलेल्या मतदारांच्या घरी पुन्हा बीएलओ (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) यांना जावे लागणार आहे. सर्व बाबींची शहानिशा करूनच ही नावे रद्द केली होती, आता पुन्हा पडताळणी होणार आहे. मात्र, त्यातून मयत, दुबार नावे तर रद्दच होतील. स्थलांतरित आणि अनुपस्थित मतदारांची नावे समाविष्ट होऊ शकतात.

 

मोहिनी चव्हाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारीप्रारूप यादीत नावे नसलेल्‍या मतदारांना पुन्हा नावे समाविष्ट करण्याची संधी मिळाली आहे. संबंधितांनी विहित मुदतीत गणना अर्ज सादर करावेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -