इचलकरंजी शिवसेनेच्यावतीने राणे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ जोरदार आंदोलन : पुतळा दहन



ताजी बातमी/ ऑनलाइन टीम
इचलकरंजी शहरातील शिवसेनेच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते त्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने जोडे मार पुतळ्याला आंदोलन व पुतळा दहन करण्यात आला. यावेळी पोलिस व आंदोलकांमध्ये झटपट ही झाली यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या राजकारणामध्ये मोठ्या उलाढाली घडू लागले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची सध्या मुंबई-कोकण आधी भागामध्ये जनसंवाद यात्रा सुरू झाले आहे.

यावेळी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे राज्यामध्ये सध्या शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष पेटला आहे. याच्या निषेधार्थ आज इचलकरंजी शहर शिवसेनेच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पुतळ्याला बांगड्या घालून चप्पल जोडे मारो आंदोलन करून पुतळा दहन करण्यात आला.

यावेळी पुतळा काढून घेत असताना पोलिस व शिवसैनिक आंदोलकांमध्ये झटापट हि झाले. यावेळी पुतळा हातात घेत असताना काही पोलिस जखमी झाले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्याचा शिवसैनिक नारायण राणे यांना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फिरकू देणार नाही जर आले तर त्यांना बांगड्याचा आहेर दिला जाईल व शिवसेना जशास तसे उत्तर देईल असा सज्जड दमही शिवसैनिकांनी नारायण राणे यांना दिला आहे.

सध्या राज्यामध्ये नारायण राणे यांच्या विरोधात जागोजागी आंदोलन सुरू झाले आहेत यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसैनिकांनी निदर्शने केली व पुतळा दहन केले.

यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी आंदोलनात मुरलीधर जाधव महादेव गौड नगरसेवक रवींद्र माने यांच्यासह महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Join our WhatsApp group