Friday, June 2, 2023
Homeइचलकरंजीइचलकरंजीत सतर्क नागरिक व पोलिसांच्या मदतीने वाचला विवाहितेचा प्राण

इचलकरंजीत सतर्क नागरिक व पोलिसांच्या मदतीने वाचला विवाहितेचा प्राण



ताजी बातमी /ऑनलाइन टीम

इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीपात्रामध्ये आज मंगळवारी सकाळी बेपत्ता चिमुकलीचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक इचलकरंजी नगरपरिषद आत्पकालिन व्यवस्थापन पथक कार्यरत होते.

याच दरम्यान ,स्मशानभूमी लगतच्या परिसरात असणाऱ्या रस्त्यावरुन पंचगंगा नदीपात्राकडे एक विवाहित महिला चालत निघाल्याचे एका हाँटेल चालक फिरोज नदाफ याच्यासह संतोष मोकाशी ,हर्ष जैन
याच्यासह काही नागरिकांच्या लक्षात आले.

त्यांनी तात्काळ याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड , इचलकरंजी पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास अडसूळ ,निर्भया पथकाच्या प्रमुख तेजश्री पवार यांना कळवली.

तेव्हा त्यांनी याचे गांभीर्य ओळखून तात्काळ पोलिस कर्मचाऱ्यांना सोबत घेवून सदर महिलेस थांबवले.तसेच तिला या परिसरात येण्याचे कारण विचारले असता तिने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली.

पण ,महिला अधिका-यांनी तिला विश्वासात घेतले असता तिने घरगुती वादातून पंचगंगा नदीमध्ये आत्महत्या करण्यासाठी निघालो असल्याची कबुली दिली.

यानंतर तिला इचलकरंजी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आणले.तसेच तिचे समुपदेशन करुन तिला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

या घटनेत पोलिस अधिकारी ,कर्मचारी व काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे सदर महिलेचा पंचगंगा नदीमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न रोखण्यात यश आले.त्यामुळे जागरुक नागरिक व कर्तव्यदक्ष अधिकारी ,कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे नागरिकांतून कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

देश विदेश

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

Most Popular

Join our WhatsApp group