Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रजुनी वाहने निघणार भंगारात : 1 एप्रिलपासून निर्णयाची अंमलबजावणी

जुनी वाहने निघणार भंगारात : 1 एप्रिलपासून निर्णयाची अंमलबजावणी

जुन्या होणाऱ्या वाहनांमुळे दिवसेंन दिवस वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी 15 वर्षाहून अधिक काळ झालेली वाहने भंगारात निघणार आहेत. सदरचा निर्णय येणाऱ्या 1 एप्रिलपासून लागू होणार आहे.केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

या कायद्या अंतर्गत 15 वर्षांहून अधिक जुन्या सर्व शासकीय वाहनांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय व महामंडळाकडे असणारी वाहने भंगारात जाणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 190 हून अधिक वाहने भंगारात जाणार आहेत. शासन जुन्या वाहनांचा वापर बंद करण्याबाबत सातत्याने निर्णय घेत असून, त्या दिशेने शासनाचे काम सुरू आहे. त्यामुळे 15 वर्षांपेक्षा जुनी वाहने आता वाहनचालकांना रस्त्यावर घेऊन फिरता येणार नाही. सातारा येथील उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत जिल्ह्यात 15 वर्षांपेक्षा जुनी वाहने असलेल्या वाहनांची माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे.

सातारा जिल्ह्यात सुमारे 190 हून अधिक वाहने 15 वर्षांपेक्षा जुनी आहेत. या वाहनांची माहिती आरटीओ कार्यालयामार्फत परिवहन विभागाकडे पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 190 हून अधिक वाहने 1 एप्रिलपासून भंगारात जाणार आहेत हे आता स्पष्ट झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -