Friday, June 2, 2023
Homeक्रीडाIPL चे दोन नवीन कर्णधार आज येणार आमने-सामने! कोणाचं पारडं जड?

IPL चे दोन नवीन कर्णधार आज येणार आमने-सामने! कोणाचं पारडं जड?

आयपीएल २०२३ स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.हा सामना आज दुपारी ३:३० वाजता पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर रंगणार आहे.या सामन्यात दोन्ही संघ आपल्या नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार आहे.

पंजाबचे नेतृत्व शिखर धवन तर कोलकाताचे नेतृत्व नितिश राणा करताना दिसून येणार आहे.आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ ३० वेळेस आमने सामने आले आहेत. ज्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० वेळेस तर पंजाब किंग्जने १० वेळा बाजी मारली आहे.

पंजाब आणि कोलकाता यांच्यात आतापर्यंत झालेल्या सामन्याचा रेकॉर्ड पहिला तर, कोलकाता नाईट रायडर्स संघाचं पारडं जड आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स हा सामना जिंकण्याची शक्यता अधिक आहे. कारण कोलकाता नाईट रायडर्स संघाने पंजाब विरुद्ध खेळताना २० सामने जिंकले आहेत.

पंजाब किंग्ज:

शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह (यष्टिरक्षक), भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, शाहरुख खान, सॅम करन, सिकंदर रजा, हरप्रीत बरार, अर्शदीप सिंग, नाथन एलिस, राहुल चाहर.

कोलकाता नाइट रायडर्स:

व्यंकटेश अय्यर, नारायण जगदीसन, नितिश राणा (कर्णधार), रहमनुल्लाह गुरबाज (यष्टिरक्षक), रिंकू सिंग, आंद्रे रसल, सुनील नारायण, उमेश यादव, शार्दुल ठाकुर, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोड़ा

RELATED ARTICLES

देश विदेश

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

Most Popular

Join our WhatsApp group