Friday, June 2, 2023
HomeसांगलीSangli News : स्वतःलाच भावपूर्ण श्रद्धांजली वाहत तरुणाची आत्महत्या!

Sangli News : स्वतःलाच भावपूर्ण श्रद्धांजली वाहत तरुणाची आत्महत्या!

सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील येळवी येथे 22 वर्षीय तरुणाने सोशल मीडियावर स्वतःचा फोटो टाकत भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवत शेतातील घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. येळवी येथील 22 वर्षीय औदुंबर विजय जगताप याचे घर येळवी गावापासून काही अंतरावर आहे. शुक्रवारी (14 एप्रिल) दुपारी तीन वाजता औदुंबर जगताप याने स्वतःच्या व्हॉट्सअॅप स्टेटलला स्वतःचा फोटो ठेवला. स्टेटस ठेवल्यानंतर काही वेळानंतर त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

औदुंबर विजय जगताप याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. जत पोलीस अधिक तपास करत आहेत. आत्महत्येची माहिती मिळताच जत पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनसाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठवला होता.

सांगलीच्या विश्रामबाग या ठिकाणी रात्री एका तळीरामाने अपार्टमेंवर चढून शोले स्टाईल आत्महत्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. एका चार मजली अपार्टमेंटवर चढून आत्महत्येच्या प्रकारामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती. सुनील प्रजापती असे या मद्यपी व्यक्तीचं नाव आहे. घरगुती भांडणाच्या रागातून दारु पिऊन त्याने थेट इमारतीच्या कठड्यावर जाऊन हा धिंगाणा सुरु केला. या घटनेचे गांभीर्य ओळखून सांगली महापालिकेचे अग्निशमन दल देखील घटनास्थळी दाखल झाले.

सुमारे पाऊण तास या ठिकाणी तळीराम सुनील प्रजापतीचा हा शोले स्टाईल आत्महत्याचा ड्रामा सुरु होता. अखेर पोलीसानी गनिमी काव्याने मागून पोहचत काठड्यावर थांबलेल्या सुनील प्रजापतीला धाडसाने पकडून ताब्यात घेतले. त्यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा श्वास सोडला. पोलीस प्रशासनाकडून मदधुंद सुनील प्रजापतीची समजूत काढण्याचा प्रयत्न सुमारे पाऊण तास सुरू होता..सुनील प्रजापती हा याच इमारतीमध्ये वॉचमन म्हणून काम करणाऱ्या महिलेचा जावई असून त्याची पत्नी आणि तो या ठिकाणी राहतात. घरगुती वादानंतर दारु पिऊन त्यांनी हा आत्महत्याचा ड्रामा केला असल्याचे समोर आले आहे.

सांगली शहरामध्ये सिनेस्टाईल पाठलाग करत महाविद्यालयीन तरुणाचा खून झाल्याची घटना गुरुवारी (13 एप्रिल) सायंकाळी घडली. भर रहदारीच्या ठिकाणी थरारक पद्धतीने एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. या खून प्रकरणी संजय नगर पोलिसांनी चार तरुणांना अटक केली. केवळ एकमेकांकडे रागाने बघण्याच्या कारणातून एका तरुणाचा तीन तरुणांनी खून केला. माधवनगर रस्त्यावरील वसंतदादा साखर कारखान्याच्या परिसरामध्ये ही खळबळ जनक घटना घडली. राजवर्धन राम पाटील, वय 18 वर्षे असे या मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो वसंतदादा औद्योगिक परिसरातील शासकीय आयटीआयमध्ये शिकत होता.

RELATED ARTICLES

देश विदेश

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

Most Popular

Join our WhatsApp group