12 आमदारांचे निलंबन रद्द झाल्याने भाजप कार्यालयात फटाके फोडून जल्लोष

राज्य सरकारने विधानसभेत गैरवर्तन केल्याच्या आरोपांवरून भाजपच्या १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले होेते. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आतापर्यत दोनदा सुनावणी घेण्यात आली होती. या सुनावणीअंती कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला असून भाजपाच्या निलंबीत १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपाचे माजी मंत्री तथा आ. गिरीश महाजन, आ.जयकुमार रावळ यांच्यासह भाजपच्या १२ आमदारांना दिलासा मिळाला असून महाविकास आघाडी सरकारला धक्का बसला आहे. या निर्णयाचा भारतीय जनता पार्टी जिल्हा महानगर्फे ‘वसंत स्मृती’ भाजपा कार्यालयासमोर फटाके फोडत पेढे वाटून आनंद व जल्लोष करण्यात आला.

Join our WhatsApp group