ताजी बातमी/ऑनलाइन टीम
मागील वर्षांपासून रॅपिअर कारखादारांची बेसीक क्वॉलिटीची कमीतकमी मजूरी १५.५० पैसे प्रति पीक ठरविणेत आलेली होती. पण मध्यंतरीच्या कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊन लागल्याने बाजरपेठा बंद असल्यामुळे याचा परिणाम मागणीवर होत होता.
त्यामुळे मजुरीमध्ये काहीप्रमाणात शिथिलता देण्याचा निर्णय घेणेत आला होता. त्याप्रमाणे आजपर्यंत हा निर्णय चालू आहे. येथून पुढे दिवाळी, लग्नसराई कार्यक्रम असलेने मागणीचा विचार करून पूर्ववत मजुरी १५.५० पैसे प्रति पीक करणेचा निर्णय आज झालेल्या मीटिंगमध्ये घेणेत आला आहे.
या निर्णयानुसार १ सप्टेंबर २०२१ पासून नविन होणारे सौदे हे १५.५० पैसे प्रति पीक या मजुरीप्रमाणे होतील असा ठाम निर्णय घेणेत आला.
सदर मीटिंगवेळी पेमेंटधारा व अन्य विषयांवर मिटींगमध्ये चर्चा करणेत आली. पेमेंटधारेबाबतचा निर्णय हा येत्या ८ दिवसात घेणेचे ठरले.
सदर मीटिंगला दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, संचालक चंद्रकांत पाटील, सुभाष बलवान, कारखानदार सुकुमार देवमोरे, कृष्णात कुंभोजे, शिलकुमार पाटील महावीर खवाटे, विजय पाटील, कुमार चौगुले, कृष्णात सातपुते, आनंदराव रवंदे यांच्यासह मोठ्या संख्येने रॅपिअर कारखादार उपस्थित होते