इचलकरंजीतील ‘त्या’ क्रीडा संकुलास राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्याची मागणी


ताजी बातमी/ ऑनलाइन टीम
माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या प्रयत्नातून मंजूर 107 कोटी निधीतून जवाहर नगर येथे इचलकरंजी नगरपरिषदेच्या जागेत भव्य क्रीडा संकुल उभारण्यात येत आहे. या क्रीडा संकुलाचे काम अंतिम टप्प्यात असून क्रीडा संकुलाच्या नावावरून राजकीय कुरघोड्या सुरु आहेत.



त्याला पूर्णविराम देण्यासाठी भागातील नागरिकांनी नामी शक्कल लढवत राजमाता जिजाऊ यांचेच नाव क्रीडा संकुलास देण्याची मागणी नगराध्यक्ष अड. अलका स्वामी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी भागातील नागरिक युवक मोठ्या संखेने उपस्थित होते.  



प्रभाग क्र. 07 मधे उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलाच्या नावाला राजकीय वळण घेतले आहे. भागातील नगरसेवक मनोज हिंगमिरे यांनी हे क्रीडा संकुल उभारण्यासाठी मोठा पाठपुरावा केला त्यासाठी नगरसेविका सौ. सुनिता कोरे यांचे सहकार्य लाभल्याचे यावेळी उपस्थित नागरिकांनी सांगितले.



आता काम पूर्ण झाल्यानंतर क्रीडा संकुलाचा नामांतरण करण्याचा कार्यक्रम समोर दिसत आहे त्या धर्तीवर राजकीय वातावरण तापवून क्रीडा संकुलाला विविध नावे सुचविली जात आहेत.



दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री “पूज्य राजमाता जिजाऊ क्रीडा संकुल असे नाव द्यावे. अशी मागणी करण्यात आली आहे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊ यांनी घडविले व महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला दिशा देण्याचे काम छत्रपती शिवरायांनी केले.



त्याचप्रमाणे या क्रीडा संकुलातून देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू निर्माण व्हावेत जिजाऊंची प्रेरणा या खेळाडूंमध्ये निर्माण होण्यासाठी राजमाता जिजाऊ यांचेच नाव क्रीडा संकुलास द्यावे आणि राजमाता जिजाऊ यांचा या निमित्ताने गौरव व्हावा असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी राजाराम पवार, सुनिल कोरवी, पांडुरंग पिळणकर हरीश पाटील, दत्तात्रय पाटील आदींसह जवाहर नगर परीसाराथिल युवक नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते

Leave a Reply

Join our WhatsApp group