‘अफू आणि हेरोईन’मुळेच तालिबान्यांचं अफगाणिस्तानावर वर्चस्व


आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासकांनी खंरतर यापूर्वीच इशारा दिला होती की, मागील २० वर्षांमध्ये अमली पदार्थ्यांच्या तस्करीतून तालिबानी (Taliban) खूप मजबूत आणि श्रीमंत झाली होती. त्यात अमेरिकेने दिर्घकाळापासून सुरू असलेले युद्ध संपवले. अफगाणिस्तान हा जगातील सर्वात मोठा अफू उत्पादक देत आहे आणि त्यामुळे काबूलवर सत्ता मिळवणे, निश्चितच होते. तालिबानच्या या घुसखोरी विजयाने संपूर्ण जग हादरले आहे. जेव्हा अमेरिका, युनायटेड किंग्डम आणि इतर देशातील शांतीसेनेनी युद्धग्रस्त देशांमधून काढता पाय घेतला तेव्हाच ही मोठी घुसखोरी झाली आहे.
तालिबान्यांच्या (Taliban) घुसखोरीमुळे अफगाणिस्तानतील परिस्थिती अराजकतेकडे जाईलच, त्याचबरोबर अफू उत्पादनालाही मोठ्या प्रमाणात दुजोरा मिळेल, तसेच तालिबान्यांची ताकद आणखी वाढेल, अशी चिंता अमेरिकेचे आणि संयुक्त राष्ट्राचे अधिकारी व्यक्त करतात.
तज्ज्ञ असं सांगतात की, “१९९६ ते २००१ दरम्यान अफगाणिस्तावर तालिबान्यांचं राज्य असताना अमली पदार्थांच्या व्यापारात बराच काळ मोठा सहभाग होता. या अमली पदार्थांच्या जागतिक व्यापारात मोठ्या प्रमाणात तस्कारी केली जात होती.”
“अशिया, आफ्रिका, युरोप, कॅनडा, रशिया आणि मध्यपूर्वेकडील देशांमध्ये अफूची निर्यात होत असताना प्रचंड प्रमाणात कर आकाराला जात होता. यातूनच तालिबान्यांची प्रचंड प्रमाणात पैसा कमवला आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या माहितीनुसार २०१८ ते २०१९ या एका वर्षात तालिबान्यांनी सुमारे ४०० मिलियन डाॅलर इतकी कमाई केली आहे.”
अमेरिकेचे सैन्य असं सांगतं की, “अफूच्या व्यापारातून तालिबानी जवळजवळ ६० टक्के इतकं उत्पन्न मिळतं.” मीडियाचे रिपोर्ट असं सांगतात की, तालिबानच्या अख्त्यारित येणाऱ्या भागांमध्ये अगदी व्यवस्थितपणे अफू पिकवला जातो आणि त्यांचा व्यापार केला जातो, तशी व्यवस्था तयार करण्यात आली आहे.
औषधांमध्ये अफू आवश्यक असल्याने त्याचा मोठा व्यापार झाला. त्यावर तालिबान्यांचं नियंत्रण असल्यामुळे अलिकडच्या महिन्यांमध्ये तालिबान्यांची (Taliban) आर्थिक ताकद मोठ्या प्रमाणात वाढली. त्यातूनच अफगाणिस्तानच्या सत्तेपर्यंत जाण्यासाठी त्यांना संधी मिळाली.
“उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत तालिबान्यांनी अफूच्या व्यापाराला मानले आहे. कारण, त्यातून स्वस्त औषधांची निर्मिती केल्यामुळे अधिक खप मिळाला. रविवारी या बंडखोरांनी काबूलवर चढाई केली. त्यातून एक लक्षात येते की, बेकायदेशीर व्यवसायांना खतपाणी घालण्यासाठी सर्वांत चांगली वेळ होती”, असं मत संयुक्त राष्टांचे अधिकारी सीजर गुड्स यांनी सांगितले.
• अफगाणिस्तान तालिबान च्या पंज्यात; एका मागोमाग एक शहरांवर कब्जा
अफगाणिस्तानातील अवैध अमली पदार्थ्यांच्या व्यवसायांवर अभ्यास करणारे डेव्हिड मॅन्सफिल्ड असं सांगतात की, “तालिबानी हे अफूच्या उत्पादनातून, अमली पदार्थ्यांच्या लॅबमधून आणि अफूयुक्त औषधांच्या जागतिक व्यापारातून कोट्यवधींची कमाई केली आहे.”
या अफूच्या व्यापारातील तालिबान्यांचा फंड टाळण्यासाठी वाॅशिंग्टनने २००२ ते २०१७ दरम्याम सुमारे ८.६ बिलियन डाॅलर खर्च केले. पण, अमेरिकेचे लष्कराचे निवृत्त अधिकारी जोसेफ व्होटेल म्हणतात की, “या अमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर नियंत्रण मिळविण्यासाठी संशयित हेराॅईन प्रयोगशाळांवर विमानाद्वारे हवाई हल्ले केले, पण त्यातून फारसे यश मिळाले नाही.”
अमेरिकेच्या या प्रयत्नातून झालं काय? तर स्थानिकांचा रोष अमेरिकेविरुद्ध आणि काबूल सरकारविरुद्ध वाढला. त्यातून तालिबान्यांनी सहानुभूती मिळवली. इतकंच नाही, तर यामध्ये अफूची शेती करून गुजराण करणारे शेतकरी कुटुंबंही होती, असं अभ्यासक सांगतात.
तज्ज्ञ पुढे असं सांगतात की, “यातून अमेरिकेचा आणि बाहेरील देशांचा हस्तक्षेप बाजूला पडला. अशा परिस्थितीत तालिबानी या दहशतवादी संघटनेला जगातून मोठ्या प्रमाणात फंड मिळाला आणि अप्रत्यक्षपणे तालिबान्यांना जास्तच दुजोरा मिळाला.”
युएनओडीसीने असं सांगितलं आहे की, “मागील ४ वर्षांमध्ये अफगाणिस्तानमध्ये जगातील सर्वात जास्त अफूचं उत्पादन झालेलं आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तानमध्ये खसखस पिकवली गेली आहे. म्हणजेच कोरोनाकाळात अफगाणिस्तानमध्ये ३७ टक्के खसखस पिकविण्यात आली आहे.
अफगाणिस्तामधील स्टेट डिपार्टमेंटमधील माजी सल्लागार बर्नेट रुबिन सांगतात की, “अफूयुक्त औषधांची इंडस्ट्री ही अफगाणिस्तानमधील ‘युद्ध’ वगळता सर्वात मोठी इंडस्ट्री आहे. सुमारे २०१७ साली अफगाणिस्तानमध्ये ९ हजार ९०० टन इतकं अफूचं उत्पादन झालेलं होतं. १.४ बिलियन रुपयांची अफूची विक्री झाली होती. याचा अफगाणिस्तानमधील जीडीपी हा ७ टक्के इतका होता.” एकंदरीत काय तर, आज अफगाणिस्तानावर तालिबान्यांनी वर्चस्व मिळवलं आहे, त्यामागे ‘अफू आणि हेरोईन’ आहे.

Leave a Reply

Join our WhatsApp group