चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम सगळ्यांना भरभरून हसवतो. अनेक चित्रपटांच्या प्रमोशनसाठी कलाकार मंडळी या कार्यक्रमात हजेरी लावतात. अक्षय कुमारचा बच्चन पांडे हा सिनेमा 18 मार्चला रिलीज होणार आहे. चला हवा येऊ द्याच्या आज आणि उद्याच्या भागात या सिनेमाची टीम प्रमोशनसाठी येणार आहे. याचे प्रोमो सध्या आऊट झाले आहेत. यात खिलाडी कुमारने अभिनेत्री श्रेया बुगडेला मोबाईल गिफ्ट दिला आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. श्रेयानेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हीडिओ शेअर केला आहे.
शेगावला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, कार-ट्रकच्या भीषण अपघातात पाच जण मृत्युमुखी
अक्षय कुमार आणि बच्चन पांडे सिनेमातील इतर कलाकारांची टीम चला हवा येऊ द्याच्या मंचावर प्रमोशनसाठी आली. यावेळी त्यांनी खूप धमाल मस्ती केली. यावेळी अक्षय कुमारने श्रेयाला मोबाईल गिफ्ट दिला. त्याचं कारणही तसंच खास आहे. श्रेया सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. तिच्या इन्स्टाग्रामवर ती नेहमी वेगवेगळे फोटो व्हीडिओ शेअर करत असते. पण यात ती चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील फोटो शेअर करत नाही असं अक्षयचं म्हणणं आहे. ती तिचा नवा कार्यक्रम किचन कलाकारमधलेच फोटो शेअर करते, असा त्याचा आक्षेप आहे.
श्रेयाने इथून पुढे चला हवा येऊ द्यामधले फोटो शेअर करावेत म्हणून त्याने हा फोन तिला गिफ्ट दिला आहे. या अनोख्या गिफ्टमुळे श्रेयाही भारावून गेली. चला हवा येऊ द्याच्या मंचावर एकच हश्या पिकला.
अक्षयने श्रेयाला एक विशेष कॉम्प्लिमेंटही दिली. “तु विद्या बालनसारखी दिसतेस”, असं अक्षय म्हणाला. त्यावर श्रेयाने जावेद अख्तर यांनीही असं म्हटल्याचं अक्षयला सांगितलं.