Tuesday, July 29, 2025
Homeबिजनेसवीस मिनिटांत दाम दीडपटचे आमिष; क्रिप्टो करन्सीच्या नावे लाखोंची फसवणूक

वीस मिनिटांत दाम दीडपटचे आमिष; क्रिप्टो करन्सीच्या नावे लाखोंची फसवणूक

शेअर मार्केटच्या धर्तीवर क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास 20 मिनिटांत 60 टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून लोकांना फसविणार्‍या दोघांना बंगळूर पोलिसांनी बेळगावातून अटक केली. विशेष म्हणजे हे दोघेजण बेळगाव जिल्ह्यातील आहेत. किरण भरतेश (वय 20) व अर्शद मोईद्दिन (वय 21, दोघेही रा. हारुगेरी, ता. रायबाग, सध्या रा. बेळगाव) अशी संशयितांची नावे आहेत.

गुगलवर अजिबात सर्च करू नका या चार गोष्टी, महागात पडू शकते छोटी चूक

या दोघा भामट्यांनी अनेक गुंतवणूकदारांकडून 3 हजारांपासून 40 हजारांपर्यंत ऑनलाईन रक्‍कम घेऊन लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. बंगळूर दक्षिण सीईएन विभागाने ही कारवाई केली.

उपरोक्‍त दोघा संशयितांनी इन्स्टाग्रामवर अनेक खाती खोलून बनावट जाहिरातबाजी केली होती. यामध्ये म्हटले होते की वेगवेगळ्या क्रिप्टो करन्सीमध्ये रक्‍कम गुंतवा व अवघ्या 20 मिनिटांमध्ये 60 टक्के अधिक परतावा मिळवा, अशा आशयाची ती जाहिरात होती. त्यांनी अशी अनेक खाती बनवून त्याद्वारे तब्बल 10 हजार फॉलोअर्स बनवले होते. यापैकी अनेकांकडून हे भामटे बँक खात्यावर ऑनलाईन, गुगल-पे, फोन-पेद्वारे हे रक्‍कम ट्रान्स्फर करून घेत होते. यानंतर संबंधितांशी संपर्क बंद करत होते. अनेकजण किरकोळ रकमेला फसलो, असे समजून तक्रार करत नव्हते. त्यामुळे या भामट्यांनी लाखो रुपयांची माया जमवल्याचा संशय आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -