अल्लू अर्जुन-रश्मिकाचा ‘पुष्पा’ या दिवशी होणार रिलीज


साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन ‘पुष्पा’ (Pushpa The Rise) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. अल्लू अर्जुन या सुपरस्टारचे चाहते आणि सिनेमाप्रेमी ‘पुष्पा’ या चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत. अखेर, फॅन्सना अल्लूकडून ख्रिसमसच्या औचित्याने हे मोठे गिफ्ट मिळणार आहे. अल्लूचा मोस्ट अवेटेड चित्रपट पुष्पा: द राईज (Pushpa The Rise) यावर्षी ख्रिसमसच्या औचित्याने रिलीज होण्यासाठी तयार आहे. अल्लूच्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. हा चित्रपट कधी रिलीज होणार याची रिलीज डेट समोर आलीये. ट्विटरवर #PushpaTheRise आणि #AlluArjun ट्रेंड करू लागले आहेत.

या चित्रपटातील पहिले गाणे जागो जंगो बकरेचा टिझर रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट सोशल मीडियावर ट्रेंड करत होता. हे गाणं पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये रिलीज झालंय.
अर्जुन, फहद फासिल आणि रश्मिका मंदाना स्टारर चित्रपट दोन भागांमध्ये रिलीज होईल. या चित्रपटाचा पहिला भाग १७ डिसेंबर, २०२१ रोजी रिलीज होईल. दुसरा भाग २०२२ मध्ये रिलीज केलं जाईल.

निर्माते नवीन यरनेनी आणि वाय. रविशंकर म्हणाले, पुष्पा एक ॲक्शनने भरपूर कहाणी आहे. यामध्ये असे क्षण आहेत. जे मनाला भावतात.

याचवर्षी ख्रिसमसच्या औचित्याने आमिर खानचा चित्रपट लाल सिंह चड्ढादेखील रिलीज होणार आहे. म्हणजे बॉक्स ऑफिसवर यावर्षी दोन बिग बजेट चित्रपटांसोबत बॉलीवूड आणि टॉलीवूड सुपरस्टार्समध्ये सामना पाहायला मिळेल.

Leave a Reply

Open chat
Join our WhatsApp group