पोलीस दलात शौर्यपूर्ण, उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण सेवा बजावणाऱ्या महाराष्ट्रातील ६८ पोलीस अधिकारी – अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. त्यात राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त आशुतोष डुंबरे, मुंबईतील उपायुक्त मंजुनाथ शिंगे, सहायक आयुक्त वासंती रासम, निरीक्षक चिमाजी आढाव आदींचा समावेश आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वदिनी केंद्रीय गृह मंत्रालयाच्यावतीने त्याची घोषणा करण्यात आली. केंद्रीय राखीव पोलीस दलातील दिवंगत हवालदार सुनील काळे (सोलापूर) यांना मरणोत्तर ‘राष्ट्रपती शौर्यपदक’ जाहीर झाले तर उर्वरित ६७ अधिकारी व अंमलदार हे महाराष्ट्र पोलीस दलातील आहेत. त्यात गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त डुंबरे, नाशिक ग्रामीणचे उपनिरीक्षक अशोक अहिरे व यवतमाळचे उपनिरीक्षक विनोदकुमार तिवारी यांना उत्कृष्ट सेवेबद्दल ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले आहे.
अन्य विजेत्यांची नावे पोलीस शौर्य पदक विजेते : मंजुनाथ शिंगे (पोलीस उपायुक्त, परिमंडळ -८, मुंबई), अतिरिक्त अधीक्षक हरी बालाजी एन., सहायक आयुक्त गोवर्धन कोळेकर, नवनाथ ढवळे, हवालदार लिंगनाथ पोर्टट, कॉन्स्टेबल मोरेश्वर वेलाडी, बिच्छू सिदम, श्यामसे कोडापे, नीतेश वेलाडी, कॉन्स्टेबल प्रवीण कुलसम, सडवली आसम, उपनिरीक्षक योगेश पाटील, सुदर्शन काटकर, हवालदार रोहिदास निकुरे, आशीष चव्हाण, पंकज हलामी, आदित्य मडावी, रामभाऊ हिचामी, मोगलशाह मडावी, ज्ञानेश्वर गावडे, एपीआय राजेंद्रकुमार तिवारी, विनायक आटकर व ओमप्रकाश जामनिक, कॉन्स्टेबल सुरेंद्रकुमार मडावी व शिवा गोरले.