छत्तीसगडमधल्या मॉल मध्ये 10 वीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या मुलीचा मित्र तिला एका मॉलमध्ये फिरायला घेऊन गेला होता. यावेळी त्याने तिला मॉल मधल्या भूतबंगल्यात त्याने तिला नेल होतं. या मुलीला भूत बंगल्यातील भूतांची भीती दाखवून घाबरवण्यात आलं होतं. मुलगी घाबरल्याचं कळाल्यानंतर तिच्या मित्राने तिच्यावर बलापार केला. यानंतर पीडितेने तिच्यावर बलात्कार करणाऱ्या मित्राच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. आरोपी हा देखील अल्पवयीन आहे. त्याचे वय 17 वर्ष असून त्याला ताब्यात देण्यात आलं आहे.
पीडितेने सांगितलं की तिची आणि आरोपीची ओळया फेसबुकवरून झाली होती. ओळख झाल्यानंतर दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. यानंतर दोघे तासनतास मोबाईलवर बोलत असायचे. यानंतर आरोपीने आपण भेटूया असं म्हणत पीडितेला मॉल मध्ये भेटायला बोलावले होते. भिलाईतील सुर्या मॉलमध्ये तिसऱ्या मजल्यावर असलेल्पा स्केअरी हाऊसमध्ये हे दोघे गेले. मुलीला भूतांची भीती दाखवून आणि अंधाराचा गैरफायदा घेत आरोपीने पीडितेवर बलात्कार केला.
या मुलीवर बलात्कार केल्यानंतर आरोपी या ठिकाणाहून पळून गेला. पीडितेने तिथून थेट आपले घर गाठलं आणि घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. यानंतर पीडितेला घेऊन तिच्या घरचे पेलिसांत गेले आणि आपली तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार दाखल करून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणी भूतबंगल्यातील कर्मचान्यांचीही चौकशी करण्यात येत आहे.