सर्वात मोठ्या विमानतळाचे भूमिपूजन

ताजी बातमी ऑनलाइन टीम

आमच्या राष्ट्रभक्‍तीसमोर काही राजकीय पक्ष टिकू शकत नाहीत. आगामी काळात उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय एअर कनेक्टिव्हिटीचे प्रमुख केंद्र राहणार आहे. पाच-पाच आंतरराष्ट्रीय विमानतळे असणारे उत्तर प्रदेश हे एकमेव राज्य ठरेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दिल्लीला लागूनच असलेल्या जेवर (नोएडा) (Noida Airport) येथे गुरुवारी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूमिपूजनानंतर ते बोलत होते. हे आशिया खंडातील सर्वात मोठे विमानतळ ठरणार आहे.

मोदी म्हणाले, इतर पक्षांचे सरकार असतानाच्या काळात नोएडा विमानतळ (Noida Airport) प्रकल्प डब्यात गेला होता. मात्र केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेत आल्यानंतर या प्रकल्पाला चालना देण्यात आली. येत्या काही वर्षांत जोवर विमानतळाचे स्वप्न पूर्ण होईल. राष्ट्र प्रथम या भावनेने आमचे सरकार काम करते.

कितीही राजकारण झाले तरी देश विकासाच्या मार्गातून हटला नाही. याच महिन्याच्या सुरुवातीला नेट झिरो कार्बन इमिशन योजनेचा प्रारंभ केला. महोबा आणि झाशी येथील प्रलंबित विकासकामे हाती घेतली. उत्तर प्रदेशात एकाचवेळी 9 वैद्यकीय महाविद्यालयांची सुरुवात करत नवीन इतिहास रचला.

Open chat
Join our WhatsApp group