आधारच्या मदतीने रोखता येणार कर चोरी; ‘एनपीसीआय’चा दावा

ताजी बातमी ऑनलाइन टीम

कर चोरी आणि इतर आर्थिक गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी आधार लिंकींग तत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो, असा दावा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (NPCI) करण्यात आला आहे. त्याबाबचा प्रस्ताव एनपीसीआयच्या अधिकाऱ्यांकडून सादर करण्यात आला आहे. याबाबत बोलताना एनपीसीआयचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप असबे यांनी म्हटले आहे की, आधार लिंकिंग तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणात कर चोरीला आळा घातला जाऊ शकतो, तसेच इतर आर्थिक गुन्ह्यांची उकल करणे देखील शक्य होणार आहे. येत्या तीन-चार वर्षांमध्ये ही प्रणाली विकसीत करण्यात येईल.

पुढे बोलताना ते म्हणाले की, देशामध्ये कर चोरी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कर चोरीचा विषय हा थेट देशाच्या विकासाशी निगडीत आहे. त्यामुळे कर चोरीला आळा घातला गेला पाहिजे आणि ते आधार कार्डमुळे शक्य होऊ शकते. प्रत्येक व्यक्तीचे बँकेमध्ये खाते असते, त्या खात्याला आधार लिंक असते. कर चोरी रोखण्यासाठी देशातील जनतेच्या भल्यासाठी आपन संबंधित व्यक्तीच्या आधार डेटावर जर लक्ष ठेवले तर आपल्याला अनेक गोष्टींचा खुलासा होऊ शकतो, तसेच कर चोरी आणि इतर आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासासाठी देखील आधार लिंकिंग उपयोगाची आहे. मात्र या सर्व गोष्टींसाठी पुढील तीन ते चार वर्षांचा कालावधी लागू शकतो. आपल्या देशात आधार हे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. ज्याचा उपयोग सर्वच ठिकाणी केला जातो. अशा परिस्थितीमध्ये जर आपण आधारच्या डेटाचा योग्य पद्धतीने उपयोग केल्यास कर चोरी थांबवली जाऊ शकते.

Open chat
Join our WhatsApp group