सरकारच्या ‘या’ योजनेतून स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी, येथे जाणून घ्या कधी होईल सुरुवात

| सोने हे गुंतवणुकदारांसाठी गुंतवणुकीचे सर्वात चांगले माध्यम आहे. एकीकडे कोरोनाचा नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंट आल्याने शेयर बाजारात भूकंप आला आणि आणि गुंतवणुकदारांमध्ये भितीचे वातावरण आहे. तर दुसरीकडे सोन्याच्या दरात वाढ होत आहे. जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक केली तर तुमच्याकडे स्वस्त सोने खरेदी करण्याची चांगली संधी आहे. सरकारच्या एसजीबी स्कीम (SGB Scheme) पाच दिवसासाठी खुली होणार आहे.
29 नोव्हेंबरपासून खुली होणार एसजीबी स्कीम शेयर बाजार कोसळल्यानंतर गुंतवणुकदार पुन्हा एकदा सोन्यात गुंतवणुकीकडे वळू शकतात, कारण यास एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानले जाते. सध्या सोने 48,466 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जात आहे.
परंतु मोदी सरकारच्या सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम 2021-22 अंतर्गत तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. याबाबत आलेल्या एका रिपोर्टनुसार, ही योजना 29 नोव्हेंबरपासून पाच दिवसांसाठी सबस्क्रिप्शनसाठी खुली होईल.

गोल्ड बाँडची इश्यू प्राईज ठरली रिपोर्टनुसार, एसजीबी योजनेत (SGB Scheme) गोल्ड बाँडची इश्यू प्राईस 4,791 रुपये प्रति ग्रॅम ठरवली आहे. याबाबतची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली आहे. सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम 202122- सीरीज VIII सबस्क्रीप्शनसाठी 29 नोव्हेंबरपासून खुली होऊन 03 डिसेंबर 2021 ला बंद होईल.
ऑनलाइन अर्ज करणाऱ्यांना सूट भारत सरकारने आरबीआयच्या (RBI) सल्ल्याने त्या गुंतवणुकदारांना नॉमिनल व्हॅल्यूवर 50 रुपये प्रति ग्रॅमची सूट देण्याचा निर्णय सुद्धा निर्णय घेतला आहे, जे ऑनलाइन अर्ज करतील आणि अर्जासाठी पेमेंट डिजिटल मोडच्या माध्यमातून करतील.
अशा गुंतवणुकदारांसाठी गोल्ड बाँडची इश्यू प्राईस 4,741 रुपये प्रति ग्रॅम सोने ठेवले आहे. सीरीज VII ची इश्यू प्राईस 4,761 रुपये प्रति ग्रॅम सोने होती.

Join our WhatsApp group