शाळा सुरु होणार की पुन्हा ब्रेक? आजच्या कॅबिनेट बैठकीकडं महाराष्ट्राचं लक्ष

ताजी बातमी ऑनलाईन टीम

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडाळाची आज एक महत्त्वाची बैठक होणार आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. राज्यात 1 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. आजच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे आजच्या कॅबिनेट बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.

सोमवारी सकाळी 10 वाजता ही बैठक सुरु होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला रुग्णालयातून उपस्थिती लावणार आहेत. ते व्हिडीओ कॉन्फर्न्सिंगद्वारे या बैठकीत उपस्थित असतील. यावेळी या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट व्यतिरिक्त राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा सेवा विस्तार आणि एसटी संप यावरही या बैठकीत निर्णय होणार आहे.

Open chat
Join our WhatsApp group