सर्वोच्च न्यायालयात बैलगाडी शर्यतीवरील सुनावणीस सुरुवात; बैलगाडी मालकांच्या आशा वाढल्या

ताजी बातमी ऑनलाईन टीम

ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या बैलगाडी शर्यतीच्या सुनावणीस आजपासून सुरुवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात आज २० मिनिटांची सुनावणी झाली. यामुळे बैलगाडा चालक- मालकांमध्ये आशा निर्माण झाल्या आहेत. राज्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सरकारी वकिलांना सुनावणी होण्यासाठी न्यायालयात विनंती अर्ज कराण्यांच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार १५ नोव्हेंबरलाच सुनावणी होणार होती. मात्र सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आज सकाळी ही बैलगाडी शर्यतीच्या सुनावणी पार पडली.

तामिळनाडू व कर्नाटक या राज्यात बैलगाडी शर्यती सुरु आहेत. मात्र महाराष्ट्रात बैलगाडा शैर्यतीवर बंदी आहे. २०१६ मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने अधिसूचना काढत काही नियम व अटींच्या अधीन राहून शर्यतींवरील बंदी उठवली होती. मात्र बंदीला प्राणीप्रेमी स संघटनांकडून सर्वोच्च न्यायालयात आवाहन देण्यात आले  .

Open chat
Join our WhatsApp group