ताजी बातमी ऑनलाईन टीम
जत; कुडनूर (ता.जत) येथे विनावापर असलेल्या जुन्या घरात हॅन्ड ग्रॅनाईट सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही स्फोटक वस्तू शाळेतील खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आली. या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक रत्नाकर नवले यांनी भेट दिली. याबाबत सांगली बॉम्बशोधक पथकास माहिती दिली. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कुडनूर येथील जिल्हा परिषद शाळेतील लहान मुले चेंडूने खेळत होती. दरम्यान चेंडू विनावापर असलेल्या जुन्या खोलीत पडला. यावेळी चेंडू आणण्यासाठी मुलांनी खोलीत प्रवेश केला. चेंडू घेत असताना त्यांना बॉम्बसारखी वस्तू दिसली. मुलांनी याबाबत नागरिकांना माहिती दिली याबाबतची माहिती पोलीस पाटील मंजुषा कदम यांनी जत पोलिसात दिली.