सांगली : जिल्ह्यात 24 तासांत 9.9 मिलीमीटर पाऊस

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सांगली; जिल्ह्यात गेल्या चौवीस तासांत 9.9 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस वाळवा तालुक्यात 27.8 मि.मी. झाला आहे. सांगलीत आयर्विन पुलाजवळ रविवारी सायंकाळी कृष्णा नदीची पाणीपातळी 7.6 फूट होती.सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यात रविवारी पावसाने उघडीप दिली होती. अधूनमधून ढगाळ वातावरण होत होते. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिली आहे.

Join our WhatsApp group