Kolhapur : परीक्षा देऊनही मार्क शून्य; शिवाजी विद्यापीठात विद्यार्थी आक्रमक

काही दिवसापूर्वी शिवाजी विद्यापीठात पेपर फुटीची घटना घडली. यामुळे निकालात गोंधळ झाला आहे. तीस विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊन देखील त्यांना शून्य मार्क मिळाले आहेत. यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले असून विद्यापीठ आवारात त्यांनी आंदोलन छेडले. हे आंदोलन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आले. पेपर फुटीची चौकशी होऊन कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. विद्यापीठात घोडेबाजार सुरु असल्याचा आरोप यावेळी विद्यार्थ्यांनी केला.

गेल्या काही दिवसापासून परीक्षा विभागात भ्रष्टाचार सुरु आहे. विद्यार्थ्यांनी प्रतिकात्मक परीक्षा नियंत्रकांना पैसे चारले आहे. कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात दोन महाविद्यालयात पेपर फुटले,. मात्र, अद्याप त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. यावर समिती नेमून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच कुलगुरूंनी पुन्हा निकाल जाहीर करावा,ग्रेव्हीन्स लिंक द्यावी अशी ही मागणी करण्यात आली.

Join our WhatsApp group