राधानगरी धरणाचा आणखी एक दरवाजा उघडला; एकुण विसर्ग ४४६५ क्युसेक

राज्यात पावसाचा जोर वाढत असतानाच राधानगरी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. आज सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरून धरणाचा ६ वा दरवाचा रविवारी सकाळी ११ वाजता उघडला होता. पण वाढत्या पावसाने केवळ दोन तासातच धरणाचा ५ वा दरवाजासुद्धा उघडला आहे.

पाणलोट क्षेत्रात वाढता पाऊस आणि डोंगरकपाऱ्यामधील ओढे, नाले यातून धरणामध्ये होणारा विसर्ग यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊन दरवाजे उघडले आहेत. सध्या राधानगरी धरणाचे एकुण दोन दरवाजे उघडले असून या दोन्ही म्हणजे पाचव्या आणि सहाव्या दरवाजातून २८५६ क्यूसेक पाणी विसर्जित होत आहे तर पॉवरहाऊसमधून १६०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणातून एकुण विसर्ग ४४६५ क्युसेक असा सुरू आहे. वाढत्या पावसाने प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Join our WhatsApp group