विराट कोहलीला मिळाली गुडन्यूज, ICC रॅंकिंगमध्ये घेतली मोठी झेप

ताजी बातमी ऑनलाईन टीम

आयसीसीने (ICC) आशिया चषक स्पर्धेनंतर बुधवारी टी-20 क्रिकेटमधील ताजे रँकिंग जाहीर केले आहेत. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली याने रँकिंगमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. विराटने रँकिंगमध्ये 14 स्थानांवरून 15 व्या स्थानांवर आला आहे. विशेष म्हणजे भुवनेश्‍वर कुमारची टॉप-10 मध्ये एंट्री झाली आहे. विराट कोहली तब्बल तीन वर्षांनी पुन्हा एकदा फॉर्ममध्ये परतला आहे.नुकत्याच झालेल्या आशिया चषकात विराटने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या करिअरमधील 71 वे शतक ठोकले. त्याचबरोबर आशिया चषकात त्याची कामगिरी देखील उत्तम राहिली. विराटने पाच सामन्यात सर्वाधिक 276 धावा ठोकल्या. सर्वाधिक धावांच्या यादीत विराट अव्वल तर मोहम्‍मद रिझवान हा दुसरा ठरला.

Join our WhatsApp group