अभ्यासाच्या तणावाने सुदर्शन चौक परिसरातील एका विद्यार्थीनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. कु. हिंदवी म्हाळसाकांत कवडे (वय २३) असे तिचे नाव आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मंदार मार्तंड कवडे (वय २७ रा. सुदर्शन चौक) याने वर्दी दिली आहे. तिच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील सुदर्शन चौक परिसरातील नगरसेविका सौ. शशिकला कवडे व सामाजिक कार्यकर्ते म्हाळसाकांत कवडे यांची मुलगी कु. हिंदवी ही सध्या बीएचएमएस चे शिक्षण घेत होती. काही दिवसांपासून ती अभ्यासाच्या तणावाखाली होती.
उद्या तिचा पेपर होता. तणावामुळेच तिला उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने औषधोपचार घेण्यात आले होते, मंगळवारी सकाळच्या सुमारास तिने याच तणावातून तिच्या खोलीमध्ये छताच्या फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समजताच नातेवाईकांनी तिला तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे
