Homeइचलकरंजीसहकाराच्या शिखरावर 'आवाडेदादांचा' मानाचा तुरा कल्लाप्पाण्णा आवाडे यांना राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार

सहकाराच्या शिखरावर ‘आवाडेदादांचा’ मानाचा तुरा कल्लाप्पाण्णा आवाडे यांना राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार

पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार चळवळीतील ज्येष्ठ नेतृत्व आणि कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक तथा विद्यमान चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांना नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज् लि., नवी दिल्ली या संस्थेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान या ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते आवाडे दादांचा सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर यांच्यासह महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, उत्तर प्रदेशचे ऊस विकास राज्यमंत्री संजय सिंग गंगवार, ऊस विकास मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी, गुजरात राज्याचे सहकार मंत्री जितू भाई वधाणी, हरियाणाचे सहकार मंत्री अरविंद कुमार शर्मा, पंजाबचे शेती व शेतकरी कल्याण मंत्री गुरमित सिंग खुदियान इ. मान्यवर प्रमुख पाहुणे तसेच साखर उद्योगातील प्रतिष्ठीत पदाधिकारी, उद्योजक, तंत्रज्ञ उपस्थित होते.

 

आवाडे दादांनी उभारलेल्या जवाहर सहकारी साखर कारखान्याने पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देत शेतकरी, कामगार आणि ग्रामीण भागाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कारखान्याच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

सहकार, साखर उद्योग, ऊर्जा, नगरविकास, शिक्षण, कृषी आणि सामाजिक क्षेत्रात आवाडे दादांनी प्रदीर्घकाळ भरीव कार्य केले आहे. त्यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे या संस्थेचे सदस्य, महाराष्ट्राचे उद्योग, ऊर्जा व नगरविकास मंत्री आणि लोकसभा सदस्य तसेच वर्ल्ड असोसिएशन ऑफ बीट अॅण्ड केन ग्रोअर्स या आंतरराष्ट्रीय संघटनेचे उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. शिक्षण क्षेत्रासह विविध सामाजिक व सहकारी संस्थांच्या उभारणीतही त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांना यापूर्वी विविध संस्थांनी जीवनगौरव, समाजभूषण, वस्त्रोद्योग भूषण, कबड्डी भूषण आणि सामाजिक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

 

या कार्यक्रमास कारखान्याच्यावतीने ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे, माजी चेअरमन उत्तम आवाडे, संचालक आमदार राहूल आवाडे, व्हा. चेअरमन बाबासो चौगुले, सर्व संचालक, कार्यकारी संचालक मनोहर जोशी आदि उपस्थित होते. या राष्ट्रीय स्तरावरील जीवनगौरव पुरस्कारामुळे जवाहर कारखाना, सभासद, शेतकरी, कामगार आणि संपूर्ण सहकार परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, आवाडे दादांच्या प्रदीर्घ कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -