जिओच्या अधिकृत पोर्टलवर वेगवेगळ्या किंमती आणि फायद्यांसह अनेक रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. त्यामध्ये 239 रुपयांच्या प्लॅनचाही समावेश आहे. या प्लॅनमध्ये 22 दिवसांची वैधता मिळते. तसेच ग्राहकांना दोन अॅप्सचा कॉम्प्लिमेंटरी अॅक्सेस दिला जातो. यामध्ये JioTV आणि JioAICloud यांचा समावेश आहे.
जिओच्या 239 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. यामध्ये रोमिंगसह लोकल आणि STD कॉलिंगचा समावेश आहे. ग्राहकांना या कॉलिंग सुविधेचा लाभ संपूर्ण 22 दिवस मिळणार आहे.
या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा दिला जातो. 22 दिवसांच्या वैधतेनुसार ग्राहकांना एकूण 33GB डेटा वापरण्यास मिळतो. या प्लॅनची माहिती जिओच्या अधिकृत पोर्टलवर देण्यात आली आहे.
239 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 100 SMS पाठवण्याची सुविधा मिळते. याचा वापर ग्राहक विविध प्रकारच्या संवादासाठी करू शकतात.जिओच्या अधिकृत पोर्टलवर 299 रुपयांचा 28 दिवसांचा रिचार्ज प्लॅन देखील उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा मिळतो. तसेच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा असून त्यात रोमिंग आणि STD कॉलिंगचाही समावेश आहे.

