Homeकोल्हापूरअंबाबाईसह सर्व मंदिरांत स्वच्छता मोहीम सुरू

अंबाबाईसह सर्व मंदिरांत स्वच्छता मोहीम सुरू

नवरात्र उत्सव अवघ्या दहा दिवसांवर आला आहे. यामुळे करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरासह शहरातील नवदुर्गा व विविध देवदेवतांच्या मंदिरात स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे. सार्वजनिक मंडळांनीही नवरात्रौत्सवाची जय्यत तयारी सुरू केली आहे.

 

दरम्यान, शनिवार व रविवार सार्वजनिक सुट्ट्यांचा दिवस असल्याने स्वच्छता मोहिमेला वेग आला आहे.

 

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम सुरू आहे. प्रतिवर्षीप्रमाणे अत्याधुनिक साधनसामग्रीच्या सहाय्याने ही वेगवान स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. शनिश्वर मंदिर ते साक्षी गणेश मंदिर परिसरातील मंदिर स्थापत्य, शिल्पाकृती, देवता व योगिनींच्या मूर्ती शनिवारी स्वच्छ करण्यात आल्या. पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार पाण्याचा वेग नियंत्रित ठेवून ही स्वच्छता मोहीम झाली.

 

 

दर्शन रांगेवर मांडव उभारणी

 

मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांचे ऊन-पावसापासून संरक्षण व्हावे, यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे दर्शन रांगेवर मंडप घालण्याचे काम सुरू आहे. मुख्य दर्शन रांगेपासून सरलष्कर भवनाकडील पूर्व दरवाजा ते जुना राजवाडा परिसरातील शेतकरी बझारपर्यंतच्या दर्शन रांगेवर मंडप घालण्यात आला आहे. याशिवाय मंदिर परिसरातील विद्युत यंत्रणा, पाणी पुरवठा व्यवस्था, स्वच्छतागृह व परिसरातील विविध सोयी-सुविधांची देखभाल दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू आहे.

 

गरुड मंडपात कडीपाट

 

मंदिर परिसरातील गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीचेही काम सुरू आहे. शनिवारी गरुड मंडपातील लाकडी कडीपाट बसविण्याचे काम सुर होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -