Homeकोल्हापूरआजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

विजेचा धक्का बसून योगेश किसन पोवार (वय ३३, रा. संभाजीनगर, आजरा) या बॅंक कर्मचाऱ्याचा आज मृत्यू झाला. आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत उतम नार्वेकर यांनी आजरा पोलिसांत वर्दी दिली.

 

रात्री उशिरापर्यंत पोलिसांत घटनेची नोंद सुरू होती.

 

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, योगेश यांचे आजरा-पोळगाव रस्त्यावरील आजरा ग्रामीण रुग्णालयानजीक घर आहे. ते येथील आजरा अर्बन बॅंकेमध्ये कर्मचारी होते. आज सुटी असल्याने ते घरी होते. घराचे बांधकाम सुरू असल्यान ते स्लॅबवर गेले होते.

 

साहित्य उचलणे व स्वच्छतेचे काम सुरू होते. साहित्य उचलताना लोखंडी पाईपचा स्पर्श त्यांच्या घरावरून गेलेल्या उच्चदाबाच्या वीज वाहिनीला झाला. त्यात त्यांना विजेचा जोरदार धक्का बसल्यावर ते जागीच कोसळले.

 

त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात आणले. त्यानंतर नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मागे पत्नी, आई, वडील, भाऊ व विवाहित बहीण असा परिवार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -