Homeमहाराष्ट्रसाखरेच्या हत्येसाठी सुपारी देणारा गणेश खाडे गजाआड

साखरेच्या हत्येसाठी सुपारी देणारा गणेश खाडे गजाआड

वाशी नाका परिसरात फायरिंग करून सुरज हणमंत साखरे यांच्यावर गंभीर हल्ला केल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार गणेश रमेश खाडे (रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शुक्रवारी (दि.२८) अटक केली.

 

याप्रकरणी यापूर्वी पाच संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, काडतुसे व वाहन आदी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यापूर्वी अटक केलेल्या आरोपींना साखरे यांचा खून करण्‍यासाठी सुपारी दिली असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. १६ जुलै रोजी दुपारी वाशी नाका सिग्नल ते फुलेवाडी रिंग रोड परिसरातील स्टार लोकल मार्केटजवळ एका अपार्टमेंटसमोर दोन अनोळखी आरोपी सुरज साखरे यांचा पाठलाग करीत होते. साखरे हे कार्यालयाचे काम पाहून बाहेर येत असताना आरोपींनी त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला. या‍त ते गंभीर जखमी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -